logo

National Science Day

28 Feb,2026

Wishing everyone a curious and inspiring National Science Day as we honour the legacy of C. V. Raman and the spirit of scientific thinking.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान

26 feb,2026

💫“रस्ता सुरक्षा अभियानात नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजची उज्ज्वल झेप!”✨🏆
"३७ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२६ निमित्त कोल्हापूर पोलीस विभाग, शहर वाहतूक नियंत्रण शाखा , कोल्हापूर यांच्याकडून २८/०१ /२०२६ रोजी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये कु. राज भोसले यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर घोषवाक्य स्पर्धेमध्ये कु. साहिल जगताप यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
यशस्वी विद्यार्थ्यांना कोल्हापूर शहर विभागातील D.Y.SP प्रिया पाटील मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले या स्पर्धेसाठी शाळेचे संस्थापक संदीप नरके साहेब यांचे प्रोत्साहन ,तर शाळेच्या मुख्याध्यापिका महेश्वरी चौगुले मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले

District Level Achievment

26 Feb,2026

✨आरएसपीमध्ये दिमाखदार यश – नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा मानाचा ठसा!....💫
रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन ( महाराष्ट्र राज्य शिक्षण व पोलीस खाते अंतर्गत) आर एस पी छात्र सैनिक शिबिर शा.कृ.पंत वालावलकर हायस्कूल कोल्हापूर या ठिकाणी पार पडला. या शिबिरामध्ये नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलच्या आरएसपी च्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत चमकदार यशाची कामगिरी बजावली. यामध्ये प्रामुख्याने संचालनामध्ये प्रथम क्रमांक पद कवायत मध्ये द्वितीय क्रमांक सर्वोत्कृष्ट युनिफॉर्म मध्ये द्वितीय क्रमांक सिग्नल पेटी मध्ये तृतीय क्रमांक
अशाप्रकारे जिल्हास्तरीय आरएसपी छात्र सैनिक शिबिरामध्ये नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल चा द्वितीय क्रमांक आला. या शिबिरासाठी शाळेचे संस्थापक संदीप नरके साहेब यांचे प्रोत्साहन ,तर शाळेच्या मुख्याध्यापिका माहेश्वरी चौगुले मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

State Level Archery Championship

24 feb,2026

✨ नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड ✨ महाराष्ट्र धनुर्विद्या असोसिएशन मार्फत आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणीत कोल्हापूर जिल्हा संघासाठी नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
स्पर्धेतील यशस्वी कामगिरी:
🔹 Compound Round
• आयुष चौधरी – 2रा क्रमांक
🔹 Indian Round
• देवराज्ञी सुतार – 2रा क्रमांक
• सृष्टी खरामाटे – 4था क्रमांक
🔹 U-15 Indian Round
• आर्या भोजने – 3रा क्रमांक
• देवराज्ञी सुतार – 4था क्रमांक
• वैदेही खोत – 5वा क्रमांक
• शौर्या घाटगे – 6वा क्रमांक
या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचा कोल्हापूर जिल्हा संघात समावेश करण्यात आला असून हा संघ सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. या यशस्वी कामगिरीसाठी विद्यार्थिनींना शाळेचे अध्यक्ष मा. संदीप नरके सर, मुख्याध्यापिका मा. महेश्वरी चौगुले मॅडम तसेच प्रशिक्षक किरण खोत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व निवड झालेल्या विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!

State-Level-Championship

22 Feb,2026

✨नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या चार विद्यार्थिनींची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड✨ कोल्हापूर व्हॉलीबॉल असोसिएशन मार्फत निपाणी येथे आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल निवड चाचणीत कोल्हापूर जिल्हा संघासाठी नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या चार विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
कुमारी हर्षाली वासवंड, रुचिता परब, सुमेधा अवसरमल आणि शर्वरी कावळे या गुणवंत विद्यार्थिनींचा कोल्हापूर जिल्हा संघात समावेश करण्यात आला आहे.
निवड झालेला कोल्हापूर जिल्हा संघ युथ चॅम्पियनशिप व्हॉलीबॉल स्पर्धा अंतर्गत देवळी, वर्धा येथे दिनांक १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झाला. दिनांक १८ ते २१ फेब्रुवारी रोजी या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या असून या स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले.
या यशस्वी निवडीसाठी विद्यार्थिनींना शाळेचे अध्यक्ष माननीय संदीप नरके सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय महेश्वरी चौगुले मॅडम यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थिनींचे प्रशिक्षक मारुती काशीद सर व संघ व्यवस्थापिका शिल्पा मोरस्कर मॅडम यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

राज्य पुरस्कार

22 feb,2026

स्काऊट–गाईडच्या विद्यार्थ्यांची राज्य पुरस्कारांनी यशस्वी झेप. विद्यार्थ्यांच्या यशाने नरकेज् शाळेचा मान उंचावला!” 🌟 मेहनतीचा मानाचा मुकुट – राज्य पुरस्कार !👑🏆 नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पन्हाळा येथील स्काऊट–गाईड विभागासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे की भारत स्काऊट आणि गाईड राज्य पुरस्कार चाचणीमध्ये आमच्या शाळेतील एकूण सात विद्यार्थी सहभागी झाले होते आणि सर्व विद्यार्थी राज्य पुरस्कारासाठी पात्र ठरले.
The Bharat Scouts and Guides ही देशातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी राष्ट्रीय चळवळ आहे. या संघटनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्काऊट्स आणि गाईड्सना विविध सन्मान प्रदान केले जातात. त्यापैकी राज्य पुरस्कार (State Award) हा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. राज्य पुरस्कार प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिस्त, नेतृत्वगुण, सेवाभाव, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी या गुणांचा सातत्याने विकास केलेला असणे आवश्यक असते. विविध प्राविण्यपदके, सेवा उपक्रम, शिबिरे, प्रकल्पकार्य आणि प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर राज्य पातळीवरील परीक्षेद्वारे हा पुरस्कार दिला जातो. राज्य पुरस्कार हा केवळ सन्मान नसून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, कर्तृत्वाचा आणि समाजसेवेच्या बांधिलकीचा गौरव आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील उच्च सन्मान म्हणजे राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्रता मिळते. तसेच दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी ग्रेस गुणांचा लाभही मिळतो.
राज्य पुरस्कार विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव आणि देशसेवेची प्रेरणा निर्माण करतो. या चाचणीत ३०० पैकी विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे गुण प्राप्त केले
– १)शौर्य पवन पाटील – २६८ गुण
२)ओमकार धनंजय सरक – २६५ गुण
३) आर्यन गणेश शेटे – २६२ गुण
४) श्रीराज हनुमंत पाटील – २६२ गुण
५) जोयल नासिर शेख – २६१ गुण
६) वेदांत देवराज पाटील – २५९ गुण
७) विश्वजीत योगेश कणसे – २५७ गुण
वरील सर्व विद्यार्थी राज्य पुरस्कारासाठी पात्र ठरले असून त्यांनी शाळेचा मान उंचावला आहे.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

शिवजयंती

19 Feb,2026

🚩 Honoring the Timeless Legacy of Chhatrapati Shivaji Maharaj! 🚩 Narake's Panhala Public School & Jr. College proudly celebrated the birth anniversary of the visionary ruler, Chhatrapati Shivaji Maharaj, with immense pride and devotion. 🎉
The entire campus resonated with enthusiasm as students and teachers united to pay tribute to the courage, strategic brilliance, and inspiring leadership of this legendary king. His life continues to be a guiding light for generations, symbolizing bravery, justice, and unwavering determination.
The celebration featured inspiring speeches, patriotic performances, and creative presentations that beautifully portrayed the remarkable journey and achievements of Shivaji Maharaj. Each activity reflected his noble ideals, strong character, and dedication to Swarajya. Through this meaningful commemoration, we strive to nurture in our students the values of courage, integrity, leadership, and perseverance — empowering them to become responsible and confident citizens of the future. 💫
We extend our sincere gratitude to everyone who contributed to the success of this memorable event. May the teachings and legacy of Chhatrapati Shivaji Maharaj continue to inspire us to work towards a brighter and stronger nation

स्मृतिदिन

17 feb,2026

स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. कोल्हापूर जिल्ह्यात मध्यमवर्गीय, सर्वसामान्य व शेतकरी वर्गाच्या पाल्यांसाठीच्या अद्ययावत शैक्षणिक संस्थांचे जनक, सहकार, शिक्षण, कृषीक्षेत्रात अतुलनीय योगदान असणारे, कोल्हापूर क्षेत्रातील शेतकरी वर्गाच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी जनतेचे उत्तम मार्गदर्शक, सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू नेतृत्व.
कुंभी - कासारी परिसराचे भाग्यविधाते स्व. डी. सी. नरके साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, जि. कोल्हापूर व परिवारातर्फे विनम्र अभिवादन...

Masai Pathar Trek

15 Feb,2026

शाळेच्या दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी आज शाळा ते मसई पठार – पांडव लेणी असा सुमारे ३० किलोमीटरचा साहसी ट्रेकिंग उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या ट्रेकिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गड संवर्धन मोहिमेअंतर्गत पांडवकालीन लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व, त्यांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसेच जतन व संरक्षणाची आवश्यकता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. याच उपक्रमांतर्गत **एनसीसी, स्काऊट–गाईड व आर.एस.पी.**च्या विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले.
या आव्हानात्मक ट्रेकदरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी अपार उत्साह, उत्कृष्ट शिस्त, सहनशक्ती व शारीरिक ताकदीचे प्रभावी दर्शन घडवत ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला. हे यश विद्यार्थ्यांच्या जिद्द, आत्मविश्वास व संघभावनेचे प्रेरणादायी प्रतीक आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हा ट्रेक सुरक्षित व यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या मेस विभाग सुपरवायझर व त्यांच्या संपूर्ण टीमचे, तसेच सर्व शिक्षक, कोचेस आणि सर्व होस्टेल विभागाचे प्रमुख यांचे क्रीडा विभागाच्या वतीने विशेष आभार व मनापासून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच क्रीडा विभागावर कायम विश्वास ठेवून प्रत्येक शैक्षणिक उपक्रमासाठी सातत्याने प्रेरणा व पाठबळ देणाऱ्या शाळेच्या माननीय प्राचार्य महेश्वरी चौगुले मॅडम यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. – क्रीडा विभाग

वीर जवानांना विनम्र आदरांजली…!

14 feb,2026

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र आदरांजली…!

Happy Birthday

09 Feb,2026

मा. श्री. संदीप अरुण नरके साहेबांना ५५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎉
कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ, कुडित्रेचे अध्यक्ष. नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूरचे अध्यक्ष. यशवंत तालुका खरेदी विक्री संघ, कोल्हापूरचे अध्यक्ष. तसेच महाराष्ट्र राज्य पणन महासंघ, मुंबईचे संचालक आपल्या दूरदृष्टी, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षण व सहकार क्षेत्रातील अमूल्य योगदानामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे व शेतकरी बांधवांचे जीवन उजळले आहे.
आपले कार्य प्रेरणादायी असून, आपले मार्गदर्शन समाजासाठी सदैव दीपस्तंभ ठरो.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यश, समृद्धी व निरंतर सामाजिक सेवेसाठी भरभराट लाभो, हीच सदिच्छा! 🌺🙏 💐 हार्दिक शुभेच्छा! 💐 शुभेच्छुक. सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग.