logo

विभागीय वूशो स्पर्धा

30 September, 2025

*🏆 नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूलच्या वूशो खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी!🏆*
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत व आदर्श विद्यानिकेतन, मिणचे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय वूशो स्पर्धेत नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली.
*✨ १९ वर्षाखालील मुले –*
७५ किलो – ओम दिलीप नलवडे (सिल्वर)
कौस्तुभ महेंद्र जगताप (सिल्वर)
अथर्व सुनील जोशी (ब्रॉन्झ)
*✨ १९ वर्षाखालील मुली –*
४८ किलो – गार्गी भालचंद्र पवार (सिल्वर)
५६ किलो – राजलक्ष्मी नानासो पालसांडे (सिल्वर)
८० किलो – मुस्कान रफिक शेख (सिल्वर)
६० किलो – भार्गवी रसाळ (ब्रॉन्झ)
🌟 या खेळाडूंना शाळेच्या *प्राचार्य माननीय महेश्वरी चौगुले मॅडम* व *चेअरमन माननीय संदीप नरके सर* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 👏 सर्व विजेते खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षक *अमर मिरजे सर* व संघ व्यवस्थापक *भानसे मॅडम* यांचे हार्दिक अभिनंदन!

विभागीय वूशो स्पर्धा

30 September, 2025

🏆👐 विभागीय वूशो स्पर्धेसाठी नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंची निवड! 👐🏆 कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत व आदर्श विद्यानिकेतन, मिणचे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *१७ वर्षाखालील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय वूशो स्पर्धेत नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली.*
*✨ १७ वर्षाखालील मुले –*
४५ किलो – समर्थ विजय धुमाळ (गोल्ड)
५६ किलो – श्रेयश संदीप कळंत्रे (गोल्ड)
६० किलो – रुद्राक्ष वाघेश्वर पाटील (गोल्ड)
६५ किलो – रणवीर गोरक्ष जामदार (सिल्वर)
५२ किलो – राज संजय भोसले (ब्रॉन्झ)
*✨ १७ वर्षाखालील मुली –*
५६ किलो – जानवी राहुल लोढा (गोल्ड)
५२ किलो – अनुष्का सचिन कुंभार (गोल्ड)
६० किलो – जाग्रवी औसरमल (सिल्वर)
*🌟 सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.🌟* या यशामध्ये *संस्थेचे चेअरमन माननीय संदीप नरके साहेब* व शाळेच्या *प्राचार्या माननीय महेश्वरी चौगुले मॅडम* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 👏 सर्व विजेते खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षक *श्री.अमर मिरजे सर* व संघ व्यवस्थापक *भानसे मॅडम* यांचे हार्दिक अभिनंदन

Awareness ession

19 September, 2025

Awareness Session on Health & hygiene.

जिल्हास्तरीय जुडो स्पर्धा

19 September, 2025

सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या जुडो विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनीचि निवड! कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत व महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जुडो स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. या स्पर्धेत नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
✨ स्पर्धेतील उल्लेखनीय यश :
🏆भूमी काशिनाथ शेळके – (१७ वर्षाखालील, ४८ किलो गट) 👉 सुवर्णपदक व सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड.
🏆जानवी लोढा – (१७ वर्षाखालील, ५६ किलो गट) 👉 सिल्वर पदक
🏆आराध्या पाटील – (१४ वर्षाखालील, ४० किलो गट) 👉 सिल्वर पदक
या यशामध्ये शाळेच्या प्राचार्या मा. महेश्वरी चौगुले मॅडम व संस्थेचे चेअरमन मा. संदीप नरके साहेब यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. 👏 सर्व विजेते खेळाडू तसेच क्रीडा *प्रशिक्षक धनंजय चव्हाण सर* व संघ व्यवस्थापक *भानसे मॅडम* यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 *🎉 आगामी विभागीय स्पर्धेसाठी भूमी शेळके हिला मनःपूर्वक शुभेच्छा

स्काऊट अँड गाईड राज्य पुरस्कार प्रशिक्षण शिबिर

17 September, 2025

स्काऊट अँड गाईड राज्य पुरस्कार प्रशिक्षण शिबिर 2025 दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्काऊट अँड गाईड तर्फे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात राज्य पुरस्कार प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन करण्यात आले.या प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कविता चौगुले, जिल्हा संघटक भारत स्काऊट अँड गाईड, कोल्हापूर, मा. श्री संजय बोंबले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पन्हाळा, व शाळेच्या प्राचार्या श्रीमती माहेश्वरी चौगुले यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडचे ध्येय, शिस्त आणि समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले.राज्य पुरस्कारासाठी आवश्यक तयारी कशी करावी याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना विविध उपक्रम, नियम आणि शपथ यांचे मार्गदर्शन करण्यात आले. शिस्तबद्ध जीवन जगण्याचे आणि कर्तव्यभावनेने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने या प्रशिक्षणात सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सेवाभाव विकसित झाला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्काऊट मास्टर श्री. अजित पाटील सर यांनी केले

Sakal Newspaper Subscription

13 September, 2025

Sakal Newspaper Subscription at Panhala Public School and Jr College.
We're excited to announce the Sakal newspaper subscription, empowering students with knowledge! 📚📰 This initiative enhances current awareness, critical thinking, and reading skills. Students stay updated on education, science, and tech trends. Sakal newspaper fosters informed citizens and supports academic growth. Highly recommended by our esteemed Chairman, Hon. Shri Sandeep Narke Saheb 🙏. A valuable resource for overall development!!

हिंदी दिवस

15 September, 2025

"14 सितंबर 2025 को नरकेज् पन्हाला पब्लिक स्कूल में हिंदी दिवस का समारोह मनाया गया। हिंदी दिवस के अवसर पर स्कूल के सभी छात्र-छात्राओं ने अपनी हिंदी साहित्य की छटाएं उपस्थित सभी शिक्षक गण तथा प्रमुख अतिथियों के समक्ष प्रस्तुत की । इस समारोह के लिए स्कूल के मा. संस्थापक नरके सर, स्कूल की प्रधानाचार्या मा. महेश्वरी मॅम, शिक्षकगण आदि ने मार्गदर्शन प्रदान किया।

जिल्हास्तरीय नेहरू शालेय हॉकी स्पर्धा

13 September, 2025

🏆 जिल्हास्तरीय नेहरू शालेय हॉकी स्पर्धेत नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची शानदार कामगिरी! 🏆 कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आयोजित *१७ वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय नेहरू हॉकी स्पर्धेत नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल संघाने उत्कृष्ट खेळ करून उपविजेतेपद पटकावले.
विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्पर्धेत दाखविलेला दमदार खेळ, जिद्द आणि संघभावना कौतुकास्पद ठरली. 👏 या यशामध्ये संस्थेचे चेअरमन माननीय संदीप नरके साहेब व प्राचार्या माननीय महेश्वरी चौगुले मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंसह हॉकी प्रशिक्षक योगेश देशपांडे सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पन्हाळा तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा

13 September, 2025

🏆 पन्हाळा तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची शानदार कामगिरी!
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पन्हाळा तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा शाळेच्या क्रीडांगणावर यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.
या स्पर्धेत १७ व १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावत उल्लेखनीय खेळाचे प्रदर्शन केले. संघातील खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, शिस्त व संघभावना कौतुकास्पद ठरली. या यशामध्ये शाळेचे चेअरमन माननीय संदीप नरके साहेब व प्राचार्या माननीय महेश्वरी चौगुले मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंसह व्हॉलीबॉल प्रशिक्षक मारुती काशीद सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पन्हाळा तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा

12 September, 2025

नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूलचा जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रवेश! ✨ कोल्हापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलच्या १४ वर्षाखालील संघाची निवड झाली आहे.
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा शाळेच्या मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत १४ वर्षाखालील गटाच्या अंतिम सामन्यात देवाळे हायस्कूलवर २-० सेटने मात करून आमच्या शाळेच्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. 🏆✌️ या सामन्यात रजत राजपाल, राजवीर भोसले व केदार पवार यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून दिला.
या यशामध्ये शाळेचे चेअरमन माननीय संदीप नरके साहेब व प्राचार्या माननीय महेश्वरी चौगुले मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 👏 विजेत्या खेळाडूंसह व्हॉलीबॉल प्रशिक्षक मारुती काशीद सर यांचे हार्दिक अभिनंदन! 🏆✌️ 💐 आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा!

जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा

11 September, 2025

कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत व पारशर हायस्कूल पारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
*१४ वर्षाखालील मुलांच्या कंपाऊंड प्रकारात – आयुष चौधरी - ब्रॉन्झ पदक
*१४ वर्षाखालील मुलींच्या इंडियन प्रकारात – देवराज्ञी सुतार - ब्रॉन्झ पदक
*१७ वर्षाखालील मुलींच्या इंडियन प्रकारात –
* आर्या भोजने- रौप्य पदक
* चार्वी फडके- ब्रॉन्झ पदक
* सोनाली पाटील - ब्रॉन्झ पदक
🏆 वरील सर्व विजेत्या खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
📌 खेळाडूंना शाळेचे चेअरमन मा. संदीप नरके साहेब व प्राचार्या मा. महेश्वरी चौगुले मॅडम यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. 👏 विजेत्या खेळाडूंचे व क्रीडा प्रशिक्षक किरण खोत सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा