logo

Annual Sports ceremony

26 Dec, 2025

नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथे दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी शाळेच्या ४१व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या मा.सौ. सोनल सावंत मॅडम (शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर) उपस्थित होत्या. शाळेचे चेअरमन मा. श्री. संदीप नरके सर, मा. सौ. जयश्री नरके मॅडम, मा. नेहा नरके मॅडम व मा. सत्यशील नरके सर, शाळेच्या प्राचार्या मा. महेश्वरी चौगुले मॅडम यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध संचलन सादर करून क्रीडा महोत्सवाची हर्षोउल्हासात सुरुवात केली. प्रमुख पाहुण्या सौ. सोनल सावंत मॅडम यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना अनुभव विद्यार्थ्यांना चेतना व नव संजीवन देणारे मार्गदर्शक शब्दांकन भाषणामध्ये समाविष्ट होते. संस्थेचे मा. चेअरमन श्री. संदीप नरके सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून खेळांचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासातील महत्त्व विषद केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आत्मविश्वास, शिस्त व नेतृत्वगुण विकसित करावेत, असे मोलाचे मार्गदर्शनपर वक्तव्य आपल्या भाषणात पालकांसाठी केले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पहिल्या दिवशीच्या फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्युनिअर व सिनियर गटांमध्ये फुटबॉलच्या रोमांचक सामन्यांचे आयोजन करण्यात आले. दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत क्रीडा भावना जपली.
शिस्त, उत्साहवर्धक व आनंदाच्या जल्लोषात नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलच्या ४१व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पहिला दिवस यशस्वीरीत्या पार पडला

राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धा

08 Dec, 2025

*🌟नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा खेळाडू राजवीर रणजीत पाटील यांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी निवड 🌟*
क्रीडा व युवा संचालनालय, जिल्हा परिषद अहिल्यानगर व जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा 14 वर्षाखालील हॉकी संघ निवडण्यात आला.
या संघात नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा खेळाडू राजवीर रणजीत पाटील याची निवड झाली असून, संपूर्ण शाळा परिवारासाठी हा गर्वाचा क्षण ठरला आहे. 🎉
ही राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धा टिकमगड, मध्य प्रदेश येथे 22 ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. 🏑* या उल्लेखनीय यशामागे शाळेचे चेअरमन *माननीय संदीप नरके सर, *प्राचार्या माननीय महेश्वरी चौगुले मॅडम* यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन तसेच *क्रीडा प्रशिक्षक योगेश देशपांडे सर* यांचे मेहनती प्रशिक्षण तसेच शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री विक्रम पाटील सर यांचे सरावातील सातत्याचे नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. 🙏
🎉 *नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल परिवाराच्या वतीने राजवीर रणजीत पाटील याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!* 🎉

State-Level Volleyball Championship!

06 Dec, 2025

Congratulations, Champions! Narake’s Panhala Public School & Jr. College proudly congratulates our talented students selected for the State-Level Volleyball Championship. 🌟
Your hard work, discipline, and team spirit have made us proud!
Special appreciation to:
✨ Chairman: Mr. Sandeep Narake
✨ Principal: Mrs. Maheshwari Chougule
✨ Coach: Mr. Maruti Kashid
for their constant guidance and support. You are an inspiration to many – keep shining!