Celebrating the beautiful bond of fun, love & protection. May this special bond of siblings always remain strong and beautiful.
नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलमध्ये रस्ता सुरक्षा व नागरी संरक्षण जनजागृती.
आज रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण या विषया अंतर्गत शाळेमध्ये आर एस पी चे विद्यार्थी त्याचबरोबर एन सी सी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या लाईव्ह कार्यक्रमात मुलांना हेल्मेट चे महत्व ड्रिंक अँड ड्राय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच लायसन्स का मिळते रस्ते कसे ओळखावे यामध्ये ग्रामीण रस्ता,शहरी रस्ता,राज्यमार्ग व राष्ट्रीय मार्ग कसे ओळखायचे, रस्त्यावरील सावध करणारी चिन्हे, माहिती सांगणारी चिन्हे, सक्तीची चिन्हे, याविषयी माहिती देण्यात आली मोटार वाहन कायद्यानुसार वाहनाच्या कमाल वेग मर्यादा किती असावेत याविषयी माहिती देण्यात आली. पेट्रोल पंपाच्या आवारात मोबाईल फोन वर बोलणे किती घातक ठरू शकते याविषयी माहिती देण्यात आली. रस्त्यावर फुटपात नसेल तर कोणत्या बाजूने चालावे याविषयी माहिती देण्यात आली.
रोड रेंज म्हणजे काय?
व्यक्तीने अनियंत्रित व्यक्त केलेला राग होय. उदाहरणार्थ एका वाहन चालकाने दुसऱ्याला कट मारणे, साईड न देणे, जोरजोरात हॉर्न वाजवणे, डीपर न मारणे, या मुळे प्रचंड अपघात भांडणे वादावादी ताणतणाव निर्माण होतात म्हणजेच रोड रेंज होय याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली ही माहिती देण्यासाठी शाळेच्या प्राचार्या महेश्वरी चौगुले मॅडम व आरएसपी विभागप्रमुख रुपेश निकम सर यांनी मार्गदर्शन केले.
Narake’s Panhala Public School & Jr. College, Panhala येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्ती, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.✨
तिरंग्याला मानवंदना देत विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली.
“एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेम” या मूल्यांचा संदेश देत हा दिवस अविस्मरणीय ठरला. ❤️💚
जय हिंद!
जय भारत!
शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या अद्वितीय कर्तृत्वाने यशाची सर्वोच्च शिखरे गाठणारे ज्ञानयोगी, दूरदर्शी नेतृत्वाचे प्रतीक शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ज्ञानपर्वाचा एक तेजस्वी अध्याय आज संपला असला, तरी त्यांच्या कार्याचा प्रकाश आणि प्रेरणेचा अखंड झरा समाजाला सदैव मार्गदर्शन व प्रेरणा देत राहील.
इ.स. २०००–२००१ मध्ये नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शुभ आगमनाने लाभलेला परिसस्पर्श आजही संस्थेसाठी अभिमानाची आणि प्रेरणेची अमूल्य आठवण आहे. त्यांच्या त्या भेटीच्या स्मृती येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.
नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज परिवारातर्फे विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली!
Friendships made at school often become memories for a lifetime. 💙
From learning together to growing together, every classroom creates bonds that go far beyond books.
Here's to the friends who make every school day brighter and every journey more meaningful.
Happy Friendship Day!