logo

National Science Day

28 Feb,2023

National Science Day Celebrated in Npps School Panhala
Science Exhibition 2023

मराठी भाषा संवर्धन सप्ताह

25 Feb,2023

नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज. मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत मराठी विभागाच्या वतीने सोमवार दिनांक २० फेब्रुवारी ते शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये सुविचार, सुभाषित, सुवचन, प्रार्थना, काव्यगायन, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, नाटिका, एकपात्री नाट्यछटा, कथाकथन, प्रश्नमंजुषा व नृत्य इत्यादी उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे

शिवजयंती

19 Feb,2023

शिवजयंती 2023@ नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल अँड डिफेन्स अकॅडमी. पन्हाळा, कोल्हापूर. NPPS Celebrating the greatest warrior and leader of the Maratha Empire, Chhatrapati Shivaji Maharaj on the occasion of #ShivajiJayanti Legends of his bravery, administrative skills, and love for our motherland continue to inspire us.

Mahashivratri

18 Feb,2023

Mahashivratri Narake's Panhala Public School & Jr. College, Panhala NCC & Scout Cadet visited Shiva Temple and performed Yoga & Meditation..

स्मृतिदिन

17 Feb,2023

कुंभी कासारी सहकार समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. डी. सी. नरकेसाहेब यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.. नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पन्हाळा कोल्हापूर

भटकंती, गडकिल्ले आणि नैसर्गिक वारसा

6 Feb,2023

नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल ➡️ आपटी गाव ➡️ पन्हाळा किल्ल्याजवळी वाड्या ते मसाई पठार असा साधारण १७ km चा प्रवास. तो इतका प्रचंड प्रेरणादायी ठरावा व विद्यार्थ्यांना शालेय जीवनाच्या व्यतिरिक्त रविवारचा एक सुंदर वेगळा दिवस जगता यावा असा विचार करून जवळपास ३०० पेक्षा जास्त मुलं, मुली, शाळेतील कामगार वर्ग या उपक्रमात सामील झाले. विद्यार्थ्यांचे स्वावलंबन, चिकाटी, प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची धडाडी ही पावलोपावली दिसत होती. सोबत असणाऱ्या सोबती बद्दल ची काळजी व स्वतः वरचा आत्मविश्वास ,स्वतःची ताकद यावर त्यांनी आजचा संपूर्ण दिवस आनंदात ट्रेक पूर्ण केला. भटकंती व खेळ यांच्या व्यतिरिक्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची तयारी, निर्धारित जागेची साफसफाई व कामगार वर्गांना मदत असेही काम सोबत केले. “गड किल्ल्यांना भेटी आणि मावळ्यांनी केलेल्या कामाची माहिती किंवा त्यांच्या बलिदान कथा विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरतात, की, ते त्यांच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या संकटांचा हसत सामना करायला तयार होतात. आपल्या समृद्ध इतिहासाचा एक छोटासा भाग आपल्याला इतकं काही शिकवू शकतो व त्या ठिकाणी असलेले निसर्गसौंदर्याची विविधता विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाची भावना निर्माण करते. सह्याद्रीच्या कड्यांसोबत वर्षानुवर्षे उभे असणारे वृक्ष, मान्सूनचा जलाभिषेक झेलत उभ्या असलेल्या तटबंदी, पश्चिमेच वार पिऊन आणि उन्हात तापून कातळ बनलेले सगळे गडकिल्ले आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देतात. आपल्या पूर्वजांचा हा वारसा किती भव्य आहे आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला किमान ह्यांच्या कथा अभिमानाने सांगू शकू म्हणूंन हा सगळा उपद्व्याप नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूलच्या परिवाराने आज आयोजित होता..